मा. न्यायालयातुन आरोपीला शिक्षा 

नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ रोजी मा. अति. जिल्हा न्यायधिश व अति सत्र न्यायधिश विशेष पोक्सो कोर्ट ओ.पी. जयस्वाल, नागपूर यांनी त्यांचे कोर्टाचे केस क्र. २९६/२०२२ मधील पो. ठाणे कळमणा येथील अप. क. २०४/२०२२ कलम ३५४, ३५४(८) ३४२ ३८४, ३२३, ५०४, ५०६ भा.द.वी. सहकलम ८ पोक्सो या गुन्हयातील आरोपी आशिष हेमराज घरडे, वय १९ वर्ष, रा. भांडेवाडी, नागपुर याचे विरुद्ध साक्षी पुरावाअंती गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस कलम ८ पोक्सो मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व १,०००/- रु. दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा तसेच कलम ३४९ भा.दं.वी मध्ये ०१ महिना सश्रम कारावास व ५,००/- रु. दंड आणि दंड न भरल्यास ०७ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा व कलम ३२३ भा.दं. वी मध्ये ०३ महिने सश्रम कारावास व ५,००/- रु. दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६ भा. दं. वी मध्ये ०३ महिने सश्रम कारावास व ५,००/- रु. दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

दिनांक १७.०४.२०२२ चे १५.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे कळमणा हद्दीत राहणारी १६ वर्षाय फिर्यादी पिडीत / मुलगी ही तिथे मैत्रीणी सोबत रोडने एन.आय.टी गार्डन जवळून जात असता आरोपी याने एका विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत मोटरसायकलने येवुन फिर्यादीस अडविले व तिला शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न केला तसेच तिचे सोबत तिला लज्जा येईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला व फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेतला. फिर्यादी हिने दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे कळमणा येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस दिनांक १९.०४.२०२२ रोजी अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयाचे तत्कालीन तपास अधिकारी पनि दंडवते  यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अँड रश्मी खापर्डे यांनी तर आरोपी तर्फे अॅड. जनबंधू यांनी काम पाहीले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि सुदेश बाण सफा रामेश्वर कोळे यांनी काम पाहिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपींना अटक

Tue Aug 22 , 2023
– सक्करदरा पोलीसांची कामगिरी  नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ ला पो. ठाणे सक्करदरा येथील विट मार्शल तसेच अधिकारी व अंमलदार हे पो. ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना रेशीमबाग, धाराशिवकर बिल्डींग जवळ, एक अक्टिवा व अॅक्सेस असे दोन गाडी वरील २ इसमावर संशय आले त्यावरून त्यांना त्यांचे जवळ अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याचे सांगुन पंचासमक्ष एनडीपीएस कायदयाचे पालन करून त्याची पंचासह झडती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com