कामठी शहरात होर्डिंगचे विद्रुपीकरण जोमात; प्रशासकीय यंत्रणा कोमात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शहर व गावे विद्रुप होण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी कायदे आस्तित्वात असतानाही बिनधास्तपने होर्डिंग, बॅनर्स ,पोस्टर जागोजागी झळकवली जातात याचा त्रास अनेकांना होतोच .कामठी शहरात विना परवानगी मोठ्या प्रमाणात होर्डिंग पोस्टर वार सुरू आहे मात्र याप्रकरणात प्रशासनात असलेल्या स्थानिक रहिवासी अधिकारी कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने नगर परिषद प्रशासनाचा महसूल बुडविन्यात येत असून शहराचे विद्रुपिकरण जोमात आणि प्रशासकीय यंत्रणा कोमात अशी स्थिती आहे.

शहरे, गावे यांचे विद्रुपिकरण थांबविण्यासाठी महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपणास प्रतिबंधक अधिनियम 1995 ,महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 आदी कायदे अस्तित्वात आहेत. तसेच काही नियमही करण्यात आले आहेत मात्र या कायदा व नियमांचे प्रभावीपणे पालन होत नाही ज्यांनी पालन करायचे त्यांनीच डोळेझाक केली असेल तर करावे काय?मालमत्तेच्या विद्रूपणास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत बेकायदा होर्डिंग,बॅनर्स लावणे दखलपात्र गुन्हा आहे.त्याशिवाय दोन महिने कारावास व दोन हजार रुपये दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे.बेकायदा फलकबाजी विरोधात उच्च न्यायालयात राज्यभरातून अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर खंडपीठाने अनेक महत्वाचे निर्देश दिले होते त्यात त्यांनी एक सूचना केली होती की बेकायदा होर्डिंग ,पोस्टर लावणाऱ्यावर सार्वजनिक संपत्तीची हानी प्रतिबंध अधिनियम व सार्वजनिक उपद्रव कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात यावा कारण या कायद्या अंतर्गत दंडासह सहा महिन्यांपासून पाच वर्षेपर्यंत कारावसाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याशिवाय न्यायालयाने अनेक निकालात अशीही भूमिका घेतली आहे की आकाशाला भिडणाऱ्या या होर्डिंग मुळे पर्यावरणाचेही नुकसान होते.स्वच्छ पर्यावरण हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे तसेच एखादी जाहिरात किंवा होर्डिंग क्षितिजाचे दृश्य अडवत असेल तर तेही मूलभूत अधिकारावर गदा आणणारा आहे.राजकीय मंडळीच्या स्वागतासाठी, कामाच्या कौतुकासाठी ,वाढदिवस किंवा कार्यक्रमासाठी होर्डिंग लावतो, कुणीही उठतो आणि कुठेही होर्डिंग लावतो ज्यामुळे शहराचे विद्रुपिकरण वाढणार आहे कामठी नगर परिषद ने याकडे विशेष लक्ष देऊन नियमानुसार अशा लोकांवर कारवाही करणे गरजेचे आहे असा सूर काही नागरिकाकडून उमटत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Tue Oct 17 , 2023
– नमो ११ कलमी कार्यक्रमात सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार – विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून या कार्यक्रमातील समाविष्ट कामे, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने कार्यवाही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com