उच्चाधिकार समितीच्या बैठकीत 454 पाणी पुरवठा योजनांना मान्यता – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई :- प्रत्येक घरी नळाने पुरेशा प्रमाणात गुणवत्तेसह पाणी पोहचविण्याचे राज्यशासनाचे उद्दिष्ट आहे.  त्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन या योजना अधिक वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आज एकूण 454 पाणी पुरवठा योजनांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 451 व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 03 योजनांचा समावेश असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

            आज मंत्रालयात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत वर्धा-105 (08 सौर ऊर्जेवर आधारितजनासह), यवतमाळ-23, गोंदिया-33, चंद्रपूर-86, गडचिरोली-32, वाशिम-48, अकोला-01, पालघर-01, जळगाव-07, अहमदनगर-21, नाशिक-06, लातूर-02, नांदेड-09, परभणी-04, बीड-46, नंदूरबार-20, उस्मानाबाद-10 अशा एकूण  454 पाणी पुरवठा योजनांना मान्यता देण्यात आली आहे. या पैकी जिल्हा परिषदेच्या 451 व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या 03 योजनांचा समावेश आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

            ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या सुधारित निकषाच्या 100 टक्केहून अधिक दरडोई खर्च असणाऱ्या योजनांना मान्यता देण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 454 पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ.राजाराम दिघे यांची मुलाखत

Thu Jun 2 , 2022
 मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.         गुरुवार, दि. 2 जून २०२२ रोजी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.  घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com