यवतमाळ :- जिल्ह्याचे पालक सचिव तथा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना यांनी शहराजवळ असलेल्या सावरगड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्याहस्ते हँन्डी एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रल्हाद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सागर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी नावंदीकर, वैद्यकीय अधिकारी सचिन तोडकरी व परिसरातील लाभार्थी, आशा व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत प्रतिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना फूड बास्केट सोना यांच्याहस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आपल्या देशातून २०२५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याकरिता जास्तीत जास्त तपासणी करावी. मोठ्या प्रमाणात या आजाराविषयी जनजागृती करावी तसेच नियमीत औषधोपचार घ्यावा.
कार्यक्रमाचे संचलन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार तालुका आरोग्य अधिकारी नावंदीकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी कैलास जवंजाळ, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुशिला मोवाडे, डॉ.गजानन खरवडे, भगवान खोकले, एस.मादुरवार, एन.चव्हाण, श्री.वासेकर इत्यादींनी परिश्रम घेतले.