संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत चोरांचे हौसले बुंलद.
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस राष्ट्रीय महा मार्गावर अर्धा कि मी अंतरावर असलेल्या आंबेडकर चौक कन्हान या वर्दळीच्या स्थळी सकाळी फळ घेण्या करिता रोडवर उभी ठेवलेली हिरो माईस्ट्रो कंपनीची दुचाकी वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.१२) मे ला सकाळी १० वाजता दरम्यान नथ्थु बालाजी चरडे हे आंबेडकर चौक कन्हान येथे फळांचे दुकानात फळांची खरेदी करीत असतांना त्यांनी हिरो माईस्ट्रो कंपनीचे पांढऱ्या रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ए जी ४४८० व ईंजन क्र जेएफ३३एएडीजीजे२२४८९ आणि चेसिस क्र. एमबीएलजीएफ३२एबीडीजीजे२३१८३ किंमत अंदाजे २५००० रूपये असुन ते रोडवर उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने सकाळी वर्दळीच्या स्थळावरून दुचाकी चोरल्याने चोरांचे चांगलेच हौसले बुंलद होत असल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नथ्थु बालाजी चरडे यांच्या तोंडी तक्रारीने पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.