संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मे महिन्याच्या सुरुवातिपासूनच तापमान 44 अंशावर पोहोचला आहे .वाढत्या तापमानामुळे उष्मघाताची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीत उष्मघाताच्या रुग्णांना वेळीच उपचार मिळावे याकरिता कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिक्षिका डॉ नयना दुफारे यांच्या नेतृत्वात सज्ज झाली असून या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पुरुष आणि स्त्री वर्गासाठी स्वतंत्र असे उष्णघात कक्ष निर्माण करण्यात आले असून उष्मघाताच्या रुग्णांना उपचार मीळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
उन्हाळ्यात तापमानात वाढ होऊन येणाऱ्या स्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागते.तापमानात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते परिणामी उष्मघाताचा धोका संभवतो.अशा स्थितीत उष्मघाताच्या रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून तयारी करण्यात आली आहे.
बॉक्स:-वैद्यकीय अधिक्षिका डॉ नयना दुफारे-उन्हाळ्यात शक्यता सुती,सैल,पांढरे कपडे वापरावेत, कामाव्यतिरिक्त बाहेर पडणे टाळावे, दिवसभरात किमान तीन लिटर पाणी प्यावे ,आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया वैद्यकिय अधिक्षिका डॉ नयना दुफारे यांनी व्यक्त केले.