– दोन सखख्या भावासह, तीन युवकांचा मृत्यू
– कार चालवणे शिकताना घडली दुर्दैवी घटना
– बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत बालभारती मैदानाजवळील घटना
नागपूर :- नुकतीच नवीन खरेदी केलेली कार शिकण्यासाठी म्हणून दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा मित्र कार क्र.एम एच ०३ ए डब्ल्यू ४५०० घेऊन बुटीबोरी येथील बालभारती मैदानावर गेले.त्या मैदानावर कार चालवीत दोन तीन चक्कर काढल्या… अन घराकडे परत जाण्यासाठी ते तिघेही निघाले.मात्र नियतीला ते मान्य नव्हते.अचानक कार चालकाचे कारवरून नियंत्रण सुटले आणि ती कार भरधाव वेगाने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल विहिरीत जाऊन कोसळली.ही घटना इतक्या कमी वेळात घडली की,घडलेला प्रकार हा काही वेळ कुणाच्याही लक्षात आला नाही.अन यातच त्यांचा विहीरीच्या खोल पाण्यात बुडून करून अंत झाला.ही हृदयद्रावक भीषण घटना सोमवार दि.१० फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत बालभारती मैदानाजवळ घडली. सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास फायर ब्रिगेड च्या मदतीने तिन्ही युवकांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.सुरज सिद्धार्थ चव्हाण(३४) , साजन सिद्धार्थ चव्हाण (२७) दोघेही रा. प्रभाग क्र.२,बुटीबोरी आणि त्यांचा मित्र संदेश चव्हाण (२७) रा. साईताज नगर,बुटीबोरी अशी या घटनेतील मृतकांची नावे असून सूरज आणि साजन हे दोघे सख्खे भाऊ आहेत.
बुटीबोरी पोलिसांनी दिलेल्या त्यांच्या प्राथमिक माहितीनुसार घटना असी की, बुटीबोरी मधील सुरज चौहान यांनी नुकतीच एक कार विकत घेतलेली होती.घटनादिनी खरेदी केलेली कार चालवून बघण्यासाठी म्हणून सुरज,साजन आणि मित्र संदेश हे तिघेही कार घेऊन बुटीबोरी येथील बालभारती मैदानावर गेले.त्या ठिकाणी कारने मैदानावर दोन तीन चक्कर मारल्या अन घराकडे परत जाण्यास निघाले. बालभारती मैदानावरून जसी कार गेटबाहेर निघाली तोच कार चालकाचे कारवरून अचानक नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल पाण्याच्या विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना इतक्या कमी वेळात घडली की, काही वेळ काय झाले हे कुणालाच कळले नाही.मात्र घटनावेळी दोन युवक हे त्या परिसरात फेरफटका मारत असतांना जवळपासच काहीतरी जोरात आदळल्याचा आवाज आल्याने ते विहिरीकडे धावत आले असता त्यांना विहिरीत कार पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी लगेच बुटीबोरी पोलीस स्टेशनला धाव घेऊन सदर घटना ही पोलिसांना सांगितली. बुटीबोरी पोलिसांनी क्षणाचीही वेळ न दवडता घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोवर खूप उशीर झाला होता.त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि मृतकाच्या मित्र परिवाराने सुद्धा घटनास्थळ गाठले.परंतु विहिरीतील पाणी इतके खोल होते की, पाण्यात कारचा अंशसुद्धा दिसत नव्हता.त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी मोटार पंपच्या साहाय्याने उपसा केले.त्यानंतर तब्बल ७ तासानंतर कारसह मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले.त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक अग्रवाल, ठाणेदार प्रताप भोसले यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासनी करीत रवाना करून घटनेची नोंद केली.पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.