उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 मुबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

            मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समूह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेतत्या बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहेत्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वाहन चालकाची अनुज्ञप्ती आता मिळणार ऑनलाईन - परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

Fri Jun 3 , 2022
पारदर्शक सेवा देण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस सेवा  मुंबई : परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी  सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात वाहन चालक (लायसन्स) अनुज्ञप्तीचे नुतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, वाहन-चालक अनुज्ञप्तीमधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी  ना-हरकत प्रमाणपत्रासाठी जावे लागणार नाही. आता या सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने […]
anil

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com