नागपूर :- नागपूर शहरातील भांडेवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यूपीएचसी) व ममता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्षनगर भांडेवाडी यूपीएचसीमध्ये आरोग्य मेळावा व आरोग्य जनजागृती अभियान २.० चे आयोजन करण्यात आले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला.
यावेळी भांडेवाडी यूपीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिती चोपकर, खुशाली उमाठे, रश्मी हलमारे आदी उपस्थित होते.
संघर्षनगर भांडेवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित आरोग्य मेळावा व आरोग्य जनजागृती अभियान २.० मध्ये लाभार्थ्यांचे रक्तदाब, मधुमेह तसेच असंसर्गिक रोजांची तपासणी करण्यात आली. लाभार्थ्यांना आयुष्मान भारत योजने अंतर्गत आयुष्मान कार्ड देखील देण्यात आले.
कार्यक्रामाला फार्मसिस्ट नितीन पवार, एएनएम वैशाली मेश्राम, सेफाली शामकुवर, उर्मीला तिरपुडे, गीता सोनवाने, प्रिया भस्मे, प्रियंका लोणारे, लॅब टेक्निशियन मीनाक्षी कोराटे, मेघा राउत, कैलाश कांबळे, स्वच्छता कर्मचारी इंदु मोटघरे, वंदना हेमंत राऊत, पल्लवी भांडारकर, श्रुती मेश्राम, मंजुषा नासरे, अनील ताकटेवार यांची उपस्थिती होती.