अजनी येथील तो वृक्ष तोडला 

नागपूर :- अजनी रेल्वे स्टेशन परिसरात 333 करोड रुपये खर्चून केबलचा उडान पूल बनत असून एका वृक्षामुळे पन्नास टक्के पुलाचे काम थांबल्याची बातमी एक महिन्यापूर्वी आली होती. तो वृक्ष आज तोडून तो मार्ग क्लियर केला.

शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी अजनी रेल्वे पूल बांधला असून त्याचे लाईफ संपल्यामुळे अनेक दिवसापासून तो नवीन बांधकामाच्या प्रतीक्षेत होता.

एक वर्षापूर्वीपासून त्यावरील जड वाहतूक बंद केली. तसेच दोन्ही साईडला मध्ये खांब गाढण्यात आले. त्यामुळे वाहतुकीची समस्या आणखी भीषण झाली. मध्ये गाढलेल्या विनाकारणच्या खांबामुळे ट्राफिकला अडथळा निर्माण झाल्याने चार चाकी वाहनामुळे दुचाकी वाहनेही अडकुन पडतात. पुलावरील लोड कमी करण्यासाठी दोन्ही दिशेकडे गाढलेले मधले दोन खांब काढले तर वाहतूक आणखी सुरळीत होऊ शकते.

तोपर्यंत या केबल पुलाचे काम जोमात करावे जेणेकरून मेडिकल व दक्षिण नागपुरात जाणारा मुख्य मार्ग क्लिअर करता येईल. अशी सूचना बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीएम स्वनिधी योजने अंतर्गत पथ विक्रेत्यांकरिता कर्ज वितरण शिबिर १० ऑगस्ट रोजी बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये भेट देण्याचे आवाहन

Thu Aug 10 , 2023
नागपूर :- पथ विक्रेत्यांच्या व्यवसायाला बळकटी प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय घेतला असून १० हजार रुपयांचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासंदर्भात उद्या गुरूवार १० ऑगस्ट रोजी बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शाखा निहाय कर्ज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com