कोदामेंढी :- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीनिमित्त उद्या 20 नोव्हेंबर बुधवारला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यासाठी यंदा निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध व्हिडिओ व पोस्ट सोशल मीडियावर वायरल करण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात उद्या 20 नोव्हेंबर बुधवार ला मतदार व लोकशाही यांच्या शुभविवाह इलेक्शन महोत्सव निमित्त आयोजित पत्रिका व्हायरल करण्यात आली आहे .
मी प्रथमता व अंतिमता भारतीय या वाक्याने लग्न पत्रिकेची सुरुवात करण्यात आली असून, भारतीय नागरिकांच्या ज्येष्ठ चिरंजीव मतदार यांच्या भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या लोकशाही सोबत शुभविवाह कार्तिक कृष्ण पाच बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी उज्वल भारताची स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल,, आपला आवाज, महाराष्ट्र विधानसभेत पाठविण्यासाठी ,आपल्या एक एक मतदान रुपी आशीर्वाद हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा यासाठी हेची निमंत्रण अगत्याचे. स्थळ आपले मतदान केंद्र असून आपले विनीत मध्ये आम्ही भारताचे लोक पत्रिकेत नमूद आहे. वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं…
आमच्या शिवाय तर मज्जाच नाही कुमारी निळीताई, चिरंजीव ईव्हीएम ने पत्रिकेच्या शेवट करण्यात आलेला आहे.