नागपूर :- शहरातील नंदनवन परिसरातील गुरुदेव नगर हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीचा कार्यक्रम मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात पार पडला. जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भाविक भक्तांनी मंदिरात पहाटेपासूनच हनुमंताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
नंदनवन परिसरातील गुरुदेव नगर येथील हनुमान मंदिरात मागील ३० वर्षापासून हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील महोत्सवाच्या निमित्ताने रमणा मारुती, कबीर नगर, ओम नगर, निर्मल नगरी यासह दूरवरून दर्शनाचा लाभ घेण्याकरिता नागरिक येतात. यावेळी तीन ते चार हजार भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले होते. जयंती महोत्सवाची व्यवस्था मंदिराचे संचालक मंडळ यांच्याकडून करण्यात आली. हनुमान जयंती महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्याकरिता संचालक मंडळातील दशरथ कुबडे, रमेश काकडे, महादेव बालपांडे,सतीश साधनकर, संजय तनमले, उदय घिये, लक्ष्मीकांत ताडपल्लीवार, गुरुदेव नगर मित्रपरिवार आणि जवाहर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.