गुरुदेव नगर नंदनवन येथे हनुमान जयंती उत्साहात

नागपूर :- शहरातील नंदनवन परिसरातील गुरुदेव नगर हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीचा कार्यक्रम मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात पार पडला. जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भाविक भक्तांनी मंदिरात पहाटेपासूनच हनुमंताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

नंदनवन परिसरातील गुरुदेव नगर येथील हनुमान मंदिरात मागील ३० वर्षापासून हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील महोत्सवाच्या निमित्ताने रमणा मारुती, कबीर नगर, ओम नगर, निर्मल नगरी यासह दूरवरून दर्शनाचा लाभ घेण्याकरिता नागरिक येतात. यावेळी तीन ते चार हजार भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले होते. जयंती महोत्सवाची व्यवस्था मंदिराचे संचालक मंडळ यांच्याकडून करण्यात आली. हनुमान जयंती महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्याकरिता संचालक मंडळातील दशरथ कुबडे, रमेश काकडे, महादेव बालपांडे,सतीश साधनकर, संजय तनमले, उदय घिये, लक्ष्मीकांत ताडपल्लीवार, गुरुदेव नगर मित्रपरिवार आणि जवाहर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्तांनी केली मनपा इमारत परिसराची आकस्मिक पाहणी

Wed Apr 24 , 2024
– स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २४) सकाळी मनपा इमारत तसेच परिसराची आकस्मिक पाहणी केली. त्यांनी मनपा मुख्यालयातील जुनी आणि नवीन इमारतीमधील विविध कार्यालय तसेच संपूर्ण परिसराचे निरिक्षण केले. याप्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com