*
-भाजप अनुसूचित जाती मोर्चा व जय युवक क्रांन्ती दलातर्फे सयुंक्त आयोजन
नागपूर – देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने कष्टऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमजीवींना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा या हेतूने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर आणि जय युवक क्रांन्ती दलाच्या संयुक्त विद्यमाने गुजरवाडी-शनिवारी, इमामवाडा, चांडक ले-आऊट परिसरात 26 ते 27 डिसेंबर 2021 पासून दोन दिवसीय भव्य ई-श्रमिक कार्ड नोंदणी महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या लाभदायक योजनेकरिता लागणारे ई-श्रमिक कार्ड नोंदणी शिबीर शनिवारी व रविवारला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर उपाध्यक्ष तसेच जय युवक क्रांन्ती दलाचे अध्यक्ष संदीप माने यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, सुरक्षाकर्मी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन इत्यादी काम करणारे श्रमजीवी, ज्यांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी व विमा योजनांचा लाभ मिळावा याकरिता संपूर्ण भारत देशात ऑ नलाईन नोंदणी केंद्रसरकारद्वारे राबविण्यात येत आहे. ई-श्रमिक कार्डाचा लाभ गुजरवाडी-शनिवारी, इमामवाडा, गणेशपेठ ,बारसिग्नल ,बोरकरनगर ,उंटखाना ,कर्नलबाग ,गाळीखाना ,चांडक ले-आऊट ई परिसरातील व्गरजु नागरिकांना हावा या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरा मार्फत ईश्रम कार्ड योजनेच्या फायद्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार. या शिबिरात परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन संदीप माने यांनी केले.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com
9370868686
dineshdamahe86@gmail.com