मुंबई :- सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी मार्फत लोकायन सांस्कृतिक संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने ‘गप्पा लोककलेच्या, महाराष्ट्र आणि गुजरातच्या’ (वातो लोककलानी, महाराष्ट्र अने गुजरातनी) या लोककलांच्या अभ्यासात्मक आणि सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाज कल्याण हॉल, सी.एस. रोड, दहिसर (पूर्व) येथे शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ६ वाजता आयोजित कार्यक्रमात डॉ. मोनिका ठक्कर लिखित ‘भुलजा भुलाबाई के लोकगीतों का उद्देश और अर्थ’ या पुस्तकाचे लोकार्पण होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील लोककलांविषयी डॉ. मोनिका ठक्कर लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ तर गुजरातच्या लोककलांविषयी राजकोट विद्यापीठ, गुजरातचे डॉ. दीपक पटेल मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्रातील लोकगीतांचे सादरीकरण डॉ. शिवाजी वाघमारे आणि वृंद तर गुजरातच्या लोकगीतांचे सादरीकरण धानी चारण करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन भागवत कथाकार मिनाबेन जोशी यांच्या हस्ते तसेच पुस्तकाचे लोकार्पण प्रा. सुरेंद्र तन्ना यांच्या हस्ते होणार आहे.
विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अकादमी तर्फे कार्याध्यक्ष स्नेहल मुजुमदार आणि अकादमी सदस्य मोनिका ठक्कर यांनी केले आहे.