अडीअडचणीत विद्यार्थ्यांच्या कायम सोबत – पालकमंत्री संजय राठोड

– दिग्रस येथे ७५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दिग्रस :- सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीत आपण कायम विद्यार्थ्यांसोबत आहो. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता केवळ अभ्यास, ध्येय आणि उज्ज्वल भविष्याकडे लक्ष केंद्रित करावे. आरोग्य सेवेसोबतच आपले शैक्षणिक उपक्रमांना कायम प्राधान्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. दिग्रस येथे अंबिका जिनिंगच्या प्रांगणात आयोजित गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यात ते बोलत होते.

शिवसेना, युवासेना, विद्यार्थींसेना, युवतीसेना व महिला आघाडी यांच्या पुढाकारात आयोजित या सोहळ्यात परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अर्जुन पावरा, ठाणेदार सेवानंद वानखडे, मार्गदर्शक अमिन चौहान, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे, शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. संजय राठोड यांनी, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहता यावे म्हणून मतदारसंघात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा पुस्तकांसह अभ्यासिका उभारल्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह पाच हजार रूपये ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती’ सुरू केली. या विद्यार्थ्यांना अमरावती येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग लावून दिले, असे सांगितले. तुम्ही मला भाऊ म्हणून हाक द्या, मी सर्वांच्याच मदतीला धावून येईल, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमात इयत्ता दहावीतील तालुक्यातून प्रथम आलेली परिणिता प्रशांत झोड, द्वितीय आर्या गणेश राठोड, तृतीय रिया लक्ष्मण वास्कर, बारावी विज्ञानमध्ये प्रथम आलेली सायली लक्ष्मण वास्कर, द्वितीय जान्हवी बालकिसन भट्टड, तृतीय पल्लवी सुनील भड, कला शाखेतील प्रथम अंजली विनोद ठाकरे, द्वितीय नंदिनी सुरेश राठोड, तृतीय प्राची शिवा चिरडे, गितांजली विजय बोडखे, बारावी वाणिज्य शाखेतून प्रथम भूमिका पांडुरंग कडू, द्वितीय संकेत भानुदास बोबडे, तृतीय प्रांजली गजानन परांडे तर बारावी सीबीएसईमधून प्रथम कल्पित अनिल खडसे या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांनी सत्कार करून प्रमाणपत्र व स्कूल बॅग, फाईल, रेनकोट, टिफीनबॉक्स, पाणीबॉटल, कंपास या भेटवस्तू देऊन कौतुक केले. पालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार आला. कार्यक्रमात ७५० विद्यार्थ्यांना सन्‍मानित करण्यात‍ आले.

तहसीलदार पावरा, ठाणेदार वानखडे, अमिन चौहाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास पद्मावार यांनी केले तर संचालन सुरेंद मिश्रा यांनी केले. आभार अभय इंगळे यांनी मानले. या कार्यक्रमास सुधीर देशमुख, राहुल शिंदे, सुभाष अटल, मिलिंद मानकर डा. संदीप दुधे, डॉ. मनोज टेवरे, प्रा. विठ्ठल काटेवाल, अरविंद मिश्रा, संजीव चोपडे, दीपक कोठारी, विनोद जाधव, दिवाकर राठोड, डॉ. विष्णू उकंडे, हितेश राठोड, लखन राठोड, बाबुसिंग जाधव, बाळू जाधव, अरुण राठोड, संजीवनी शेरे, माधुरी महल्ले, वर्षा निगोट, माला लोखंडे, शीतल होडगीर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“डॉ. पंजाबराव देशमुख- सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती”मराठा, कुणबी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

Fri Jul 19 , 2024
Ø अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जुलै नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे च्या वतीने मराठा-कुणबी लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता “डॉ. पंजाबराव देशमुख- सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती” 2024-25 योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 30 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून मराठा-कुणबी समाजातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com