मनाई असूनही वाहनावर पोलीस लोगोचा सर्रास वापर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– दुसऱ्याला देतो….अन दिव्याखाली अंधार…

कामठी :- गुन्हेगारांचा शोध घेताना कुठल्याची प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये तसेच गुन्हे घडल्यानंतर गुन्हेगारांना पसार होण्यासाठी मदत होऊ नये यासाठी सक्त पावले उचलत कुठल्याही खासगी दुचाकी व चारचाकी वाहणावर ‘पोलीस’शब्द अथवा वाहतूक शाखेच्या लोगोचा वापर करण्याबाबत सरकारने मनाई केली आहे .असे जरी असले तरी शहरात धावणाऱ्या काही खासगी वाहनावर ‘पोलीस’हा शब्द आणि पोलिसांचा लोगो दिसून येत असल्यामुळे ‘दिव्याखाली अंधार’असल्याचे दिसुन येत आहे.

राज्याच्या गृहविभागाने 1 डिसेंबर 2015 रोजी परिपत्रक काढत प्रत्येक पोलीस स्टेशन ला निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत.राज्य शासनाने दिलेले आदेश ,केलेल्या कायद्याचे पालन नागरिक करोत नसल्याने त्यांच्या विरोधात कायद्याचा धाक दाखवत दंडात्मक अथवा कायद्यातील तरतुदीनुसार कारवाही करणाऱ्या पोलीस विभागाकडून मात्र गृहविभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.

नो पार्किंगमधील टोइंगची कारवाही टाळण्यासाठी तसेच आपला पोलीस रुतबा दाखविण्यासाठी खासगी वाहनावर पोलीस पाटी अथवा रेडियमद्वारे ‘पोलीस’हा शब्द लिहीला जात असल्याचे बाब यानिमित्ताने समोर आली आहे.विशेष म्हणजे याबाबत दिवसेंदिवस वाढत्या तक्रारी लक्षात घेता याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबत ठोस पावले उचलून राज्यात आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्वसामान्य वाहनधारकानी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही अथवा कायद्याने आखुन दिलेल्या चौकटीच्या बाहेर कृती केली तर त्यावर वचक बसविण्या बरोबरच कायद्यानुसार कारवाही करण्याचे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत.अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र खासगी वाहणावर पोलीस ,वाहतूक शाखेचा लोगोचा वापर करत पोलिसाकडूनच गृहविभागाबरोबर उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसविले जात आहे.

 – खासगी वाहनावर पोलीस शब्दाच्या वापराबाबत राज्याच्या गृहविभागाने डिसेंबर 2015 मध्ये याबाबतचे परिपत्रक काढले होते मात्र या पत्रकाची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते तसेच पोलीस दलाकडून या आदेशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याची बाब समोर आली आहे.या प्रकारामुळे कायद्याचे उल्लंघण करणाऱ्यावर कारवाही होणार का?याकडे आता लक्ष लागले आहे.

– वाहतूक पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी

– प्रादेशिक परिवहन विभागाच्या नीयमानुसार दुचाकी किंवा चारचाकी वाहनासाठी नंबरप्लेटसाठी विशिष्ट आकार ठरलेला आहे.याव्यतिरिक्त वाहनावर कोणताही शब्द लिहिल्यास कारवाही होते मात्र हे नियम धाब्यावर बसवत वाहणावर पोलीस, प्रेस,पत्रकार आदी शब्द लिहिले जातात या प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

@ फाईल फोटो

NewsToday24x7

Next Post

केसांवर फुगे....केसांवर भांडे...आता केसांवर पैसे!

Sun May 21 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- काही वर्षे अगोदर केसांवर फुगे मिळायचे ,नंतर केसांवर भांडी आता मात्र केसांवर पैसे मिळायला लागले आहेत.होय खरं आहे .कवडीमोल किंमत असणाऱ्या केसाला मोल आलंय. आधुनिक जमान्यात खाण्याच्या गोष्टी स्वस्त आणि सौंदर्याच्या वस्तू महाग झाल्या आहेत.कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या केसांना आता प्रतिकिलो तीन हजार रुपयाचा भाव मिळत आहे. ताण तणाव तसेच आहार विहारातील बदल यामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com