नागपूर :- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त व समाजसुधारक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त गुरुवारी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार राम गुंडीले, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गंगाधर कावडे, रुपेश काळे, रतन सूर्यवंशी, भाजपा प्रदेश कार्यालय सह सचिव सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते.