मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त मंगळवारी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, सहप्रभारी सुमंत घैसास, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.