यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला.
यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी देखील प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.