मुंबई :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश प्रवक्ता अवधूत वाघ, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.