नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंतीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आला. उपायुक्त प्रदिप कुळकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाला उपायुक्त चंद्रभान पराते, धनंजय सुटे, कमलकिशोर फुटाणे, विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे, तहसीलदार अरविंद सेलोकर, एन एम. ठाकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी छाटेखानी कार्यक्रमात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताचे गायन आणि पोवाडा पुष्पा रमेश उईके व चमु यांनी सादर केला.