संविधान चौकात बाबासाहेबांना अभिवादन

नागपूर :- जगाला शांती, करूणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनानिमित्त धम्मसेनेतर्फे संविधान चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण केल्यानंतर उपस्थित भंन्ते, उपासक उपासिका यांना त्रिशरण, पंचशील दिले. यानंतर ससाई यांनी तथागत बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तत्पूर्वी धम्मसेना आणि इंदोरा बुध्द विहार कमिटी तर्फे इंदोरा बुद्ध विहार परीसरातील पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यानंतर इंदोरा चौक आणि विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी भंते नागसेन, भिमाबोधी, अश्वजित, नागवंश, भिक्खुनी संघप्रिया, विशाखा, धम्मशीला, रवी मेंढे, शैलेश सवईथुल, अशोक गोवर्धन, आशिष शेंडे, मिताश सवाईथुल, अर्णव सवाईथुल, रंजना मेश्राम, सुजाता अंबादे यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

' नो योर टैलेंट' व करियर मार्गदर्शन शिविर आज से

Fri May 24 , 2024
नागपुर :- परीक्षा व चुनौतियों के दौर में बच्चों व विद्यार्थियों को अपने जीवन में किन विषयों पर ध्यान केंद्रित कर आगे बढ़ना चाहिए पर मार्ग दर्शन करने के लिए ‘नो योर टैलेंट’ मार्गदर्शन शिविर का आयोजन 18, लता कुंज, अभ्यंकर नगर पेट्रोल पंप के पीछे, अभ्यंकर नगर में 24 मई से 31 मई तक रोजाना सुबह 11 बजे से […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com