खासदार हेल्थ कार्ड ज्येष्ठाना वरदान ठरेल ..आमदार चंद्रशेखर बावनकुळे

– खासदार हेल्थ कार्ड चे नोंदणीपत्र देताना आ. चंद्रशेखर बावनकुळे, डॉ विकास महात्मे, आ. मोहन मते, डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ गिरीश चरडे.
– सुशासन दिवसानिमित्त आयोजन… भाजप वैद्यकीय आघाडीचे आयोजन…
नागपुर –  स्वप्न नितीनजींचे, ज्येष्ठ्यांच्या उत्तम आरोग्याचे हे ब्रीद साकारताना *भारत सरकार चे लोकप्रिय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यास वरदान ठरलेली खासदार हेल्थ कार्ड नोंदणीपत्र शिबीराचे भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वात नागपूर शहरात 120 ठिकाणी शिबीर संपन्न झाले.या आरोग्यसेवेचा लाभ फक्त 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून खासदार हेल्थ कार्ड द्वारा ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवेमध्ये विशेष सवलतीच्या दरात औषधी सुविधा,पॅथोलॉजी सुविधा, रेडिओलॉजी सुविधा, डायलीसिस सुविधा, नेत्र, दंत, कान, नाक तपासणी, रुग्णवाहीका आदी सवलती मिळतील.
भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर महानगर द्वारा आयुर्वेद तज्ञ डॉ कोमल काशीकर यांचे लारीशा आयुर्वेदिक , तुकडोजी पुतळा येथे शिबिराचे उदघाटन विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे शुभहस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे सर, आमदार मोहनजी मते, दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री देवेंद्र जी दस्तुरे,दक्षिण महिला आघाडी च्या अध्यक्ष सौ ज्योतीताई देवघरे,भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ गिरीश चरडे, महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे, ज्ञानेश धाकूळकर, डॉ दुरुगकर, आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.याप्रसंगी भारतरत्न स्व अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सुशासन दिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय आघाडीच्या तज्ञ डॉक्टर्स द्वारे महिलांच्या गर्भाशय व स्तन कॅन्सर चे  पॅप स्मेर, तपासणी व रक्तदान,शिबीराचा 100 हुन अधिक नागरिकांनी उत्साहात लाभ घेतला. या शिबिरात खासदार हेल्थ कार्ड चे फॉर्म्स भरण्यात आले असून नागरिकांनी या साप्ताहिक शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केली आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

विज्ञान के मदद से विदर्भ में दूग्‍ध क्रांति होनी चाहिए

Sun Dec 26 , 2021
  -केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,  मदर डेयरी प्रशासन पर नाराजगी जतायी नागपुर – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने उम्मीद जताई कि नवीनतम तकनीक की मदद से ज्यादा दूध देने वाली गायों का निर्माण होना चाहिए और विदर्भ में दुग्‍ध क्रांति होनी चाहिए। उन्होंने मदर डेयरी की कार्यप्रणाली पर नाराजगी जताते हुए संबंधित अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करने के बारें में विचार किया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com