नागपूर :- नागपूर महापालिकेचे प्रथम महापौर व माजी मंत्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची जयंती निमित्त मंगळवारी (२४) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी मनपा हिरवळीवर स्थापित त्यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करून अभिवादन केले. बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळात महत्वाच्या विभागाचे मंत्री होते. भारतीय क्रिकेट बोर्ड भूतपूर्व अध्यक्ष होते. मुंबईचे सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियम त्यांचा नावावर आहे. त्यांची मुलगी कुंदा विजयकर सुद्धा नागपूर महापालिकेच्या प्रथम महिला महापौर होत्या. त्यांचा जयंती निमित्त, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अजय चारठाणकर, उपायुक्त विजया बनकर, सहायक आयुक्त श्याम कापसे, अधीक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अनंता नागमोते, अमोल तपासे, लुंगे, केदार मिश्रा, प्रमोद हिवसे, कमलेश झंझाळ, आनंद वऱ्हाडपांडे आणि इतर उपस्थित होते.