मुंबई :- स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह उपस्थित अधिकारी,कर्मचारी आदींनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटले आहे की “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी अतुलनीय पराक्रम गाजवला. ते रणधुरंधर, मुत्सद्दी आणि महापराक्रमी होतेच पण विद्वत्तेचा महामेरू होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आशीर्वाद, प्रेरणा हेच आपल्या सर्वांचे संचित आहे.यातूनच आपण महाराष्ट्राच्या लौकिकाची पताका अशीच विश्वात डौलाने फडकत ठेवण्याचा प्रण करूया. छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!