संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– न्यायाधीशांनी घेतला रॅलीमध्ये सहभाग
– बेटी बचाव बेटी पढाव मोहीम अंतर्गत मुलींच्या संरक्षणासाठी शपथ घेण्यात आली
– मोहिमेसाठी स्वाक्षरी अभियान पण राबविण्यात आला
कामठी:- आज दिनांक 29 1 2025 रोजी कामठी शहरातील अब्दुल सत्तार फारुकी शाळा नगरपरिषद कामठी व इतर शाळेतील 1000 मुला-मुलींनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला बेटी बचाव बेटी पढाव या महिला बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अभियानाला 22 जानेवारीपासून सुरुवात झाली असून आठ मार्चपर्यंत हा अभियान चालणार आहे बेटी बचाव बेटी पढाव तसेच मुलांचे अधिकार व संरक्षण या विषयावर माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सर्व तालुक्यांमध्ये शाळेच्या विद्यार्थिनी सोबत प्रभात फेरी काढण्यात येत आहे व बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांना बाल संरक्षण कायद्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे, कामठी तालुक्यात अब्दुल सत्तार फारुकी शाळेमध्ये न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिन पाटील यांनी स्वतः उपस्थितीत दर्शवून मुलांच्या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला वो बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर शपथ घेतली .
सदर कार्यक्रमात कामठी न्यायालयातील न्यायाधीश व तालुका विधी सेवा प्राधिकरण यांचे पदाधिकारी उपस्थित होते कामठी विभागातील पोलीस अधिकारी व दामिनी पथक पण उपस्थित होते तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी रंजीत कुरे, छाया राऊत अध्यक्ष बालकल्याण समिती, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तोडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अंजली निंबाळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, जिल्हा बाल रक्षक समन्वयक प्रसन्नजीत गायकवाड, बाल संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, चाईल्ड लाईन प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या, जिल्हा समन्वय, सायना शेख नगरपरिषद मुख्याध्यापक, नकीब, केंद्रप्रमुख गजबे, व इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.