संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) सामन्यांचे भव्य आयोजन

विद्यापीठात जय्यत तयारीला वेग

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली दिनांक 31 आक्टोबर ते 04 नोव्हंंबर 2022 या कालावधीत विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर भव्य प्रमाणात पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अमरावती शहर विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या शुभहस्ते, तर कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा दिनांक 31.10.2022 रोजी सकाळी 8.00 वाजता विद्यापीठाचे क्रीडा संकुलावर संपन्न होणार आहे. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

पाच राज्यांचे संघ होणार सहभागी

विद्यापीठ क्रीडा संकुलावर होत असलेल्या स्पर्धेत गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतील सुमारे 72 विद्यापीठांचे संघ आपल्या खेळांचे कौशल्य प्रदर्शन करतील. स्पर्धेमध्ये मागील वर्षीचा विजेता संघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, स्वर्णीम गुजरात क्रीडा विद्यापीठ, गांधीनगर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर आणि लक्ष्मीबाई शारीरिक शिक्षण संस्था, ग्वॉलियर हे संघ आपले मानांकन टिकविण्यासाठी झुंज देतील. या स्पर्धा बाद आणि साखळी पद्धतीने संपन्न होतील.

उत्तम मैदाने आणि पात्र पंचांची नियुक्ती

व्हॉलीबॉल स्पर्धांचे तंत्रशुद्ध आयोजन होण्याकरिता विद्यापीठाद्वारे चार उत्तम मैदानांची निर्मिती करण्यात आली असून मैदाने निर्माण करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. सदर स्पर्धा तंत्रशुद्ध पद्धतीने पार पडाव्यात म्हणून विद्यापीठाद्वारे पात्र पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. मैदाने सुसज्ज करण्याच्यादृष्टीने मैदाने निर्मिती समितीच्या मार्गदर्शनात हे कार्य निरंंतर सुरू आहे.

विविध समित्यांचे गठण

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) स्पर्धेकरिता सुमारे 72 संघ सहभागी होणार असल्यामुळे विद्यापीठाच्या आयोजनाला यावर्षी अभुतपूर्व असा प्रतिसाद लाभलेला आहे. स्पर्धा यशस्वी करण्याच्या दृष्टीकोनातून निवास समिती, मैदाने निर्माण समिती, तांत्रिकी समिती, उद्घाटन व समारोप समिती अशा विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता व्हॉलीबॉल या खेळाशी निगडीत शहरातील विविध क्रीडा मंडळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक/शिक्षक आपल्या सेवा उपलब्ध करून देत आहे. संपूर्ण स्पर्धेकरिता गठीत समित्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव, डॉ. तुषार देशमुख यांचे मार्गदर्शनात सर्व कार्य संपन्न होत आहे.

प्रेक्षकांकरिता भव्य गॅलरीचे निर्माण

या स्पर्धेत सहभागी होणा­या महिला व्हॉलीबॉल पटूंचे क्रीडा कौशल्य बघता यावे, याकरिता विद्यापीठाच्यावतीने भव्य अशा गॅलरीचे निर्माण करण्यात आले असून सुमारे 1000 प्रेक्षक त्याचा लाभ घेऊ शकतील. स्पर्धेचा समारोप समारंभ दिनांक 04.11.2022 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यापीठाचे क्रीडा संकुलावर संपन्न होणार आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला तसेच क्रीडापटूंचा उत्साह वाढविण्याकरिता सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन या स्पर्धेचे आयोजन सचिव तथा विद्यापीठाचे क्रीडा संचालक, डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्या वतीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन, 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

Fri Oct 28 , 2022
नागपूर :- शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना ऊर्जा बचतीची जाणीव व्हावी यासाठी ऊर्जा दक्षता ब्युरो व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यातर्फे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या दोन उत्कृष्ट चित्रांसह www.beestudentsaward.in या संकेतस्थळावर 31 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘देशभक्तीचे दीप लावूया, राष्ट्रासाठी ऊर्जा वाचवूया’ व ‘ऊर्जा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com