अरोली :- बाबदेव – धामणगाव जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धामणगाव येथे डीसीसी क्रिकेट संस्था धामणगाव यांच्या संयुक्त विद्या माने उद्या 11 फेब्रुवारी मंगळवारपासून ते 18 फेब्रुवारी मंगळवार पर्यंत भव्य रात्र कालीन तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आलेले आहे. क्रिकेट व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम 19 फेब्रुवारी बुधवारला रात्री दहा वाजता आयोजित केला आहे ,तत्पूर्वी बुधवारला सकाळी दहा वाजता पासून राष्ट्रीय आझाद कलापथक निळा निशान मुक्काम शाहिरा सुरमा बारसागडे यांच्या संपूर्ण पार्टी विरुद्ध आदर्श गुरु सुभान पार्टी मुक्काम निलज (बु .)शाहीर राजहंस देवगडे यांच्या संपूर्ण पार्टी यांच्या राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा होणार आहे ,तर सायंकाळी आठ वाजता गावातील लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
या टूर्नामेंट साठी विविध राजकीय ,सामाजिक व व्यापारी वर्गाकडून आकर्षक प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पुरस्कार सह मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर तर फायनल सामन्या करता चेअर गर्ल्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेंट प्रमाणे येथील आयोजित टूर्नामेंटची रंगत वाढवणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस स्टेशन मौदाचे ठाणेदार सरीन दुर्गे, एस के ब्रिक्स आनंद कंट्रक्शन अँड डेव्हलपर्स चे शौकत देशमुख, कार्यक्रमाचे सह उद्घाटक माथणी सरपंच श्याम वाडीभस्मे ,मौदा तालुका भाजपा महामंत्री सचिन मोटधरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी शेषराव देशमुख सह गावातील ,परिसरातील, तालुक्यातील सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, पुढारी ,मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या आठ दिवसीय क्रिकेट टूर्नामेंटच्या लाभ घेण्याचे आव्हान गट ग्रामपंचायत धामणगाव (कुंभारी) चे सरपंच अक्षय पंचबुधे, कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष कुणाल पंचबूधे,उपाध्यक्ष विक्की कातुरे, सचिव अनिल माटे ,सहसचिव आकाश पंचबूधे, कोषाध्यक्ष निखिल भोयर ,सह कोषाध्यक्ष पंकज मांदाडे, क्रीडा प्रमुख देवानंद संतापे, क्रीडा संघटक मंगेश भोयर, क्रीडा व्यवस्थापक चेतन पंचबुधे, संकेत पंचबूधे, डीसीसी क्रिकेट संघाचे कर्णधार दक्षक पंचबूधे, उपकर्णधार रोहित कडू सह समस्त खेळाडू वर्ग व समस्त धामणगाव वासियांनी केले आहे व समस्त ग्रामवासी युवावर्ग कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम व सहकार्य करताना दिसत आहे .