संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी तसेच एसकेबी काॅलेज ऑफ फार्मसी, गादा, कामठी या महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘क्षितीज’ चे उद्घाटन सोहळा स्व वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाइन्स नागपुर येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १०.०० वाजता थाटात पार पडला.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव सुरेश भोयर, औरोबिंदो फार्मा चे सहयोगी उपाध्यक्ष एपीआय आर अॅन्ड डी डॉ नासिर अली, सिनीअर जनरल मॅनेजर श्रीधर सुरत, ल्युपीन लिमी नागपूर चे साईट हेड स्टेराईल इन्जेक्टेबल किरण देशमुख, टी विजय कुमार, हेड एच.आर. ल्युपीन लिमी नागपूर, यांच्या शुभहस्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, डॉ अतुल हेमके, विद्यार्थी कल्याण चे अधिष्ठाता प्राध्यापक राधेश्याम लोहिया प्रामुख्याने उपस्थितीत होते. यावेळी फार्मसी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष ओजस कुंभलकर, शैली बाजपेयी, हर्षल बारी, साक्षी देवारे उपस्थित होते.
याप्रसंगी ल्युपीन लिमी. नागपूर यांच्यातर्फे सत्र २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना कंपनीच्या उपस्थित अधिकारी मान्यवरांच्या हस्ते ल्युपीन स्काॅलर अवार्ड प्रदान करण्यात आला. ज्यात बी.फार्म अंतिम वर्षातील आयुशी मोकाटी व मयुर महाजन तसेच एम.फार्म अंतिम वर्षातील शिवकुमार सम्मेटा व संकेत कुरुमकर या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी केले, तसेच संचालन मार्क्स स्टुअर्ट व मयुरी ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष ओजस कुंभलकर यांनी केले.
याव्यतिरिक्त स्नेहसंमेलन ‘क्षितीज’अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे नाटक, वादविवाद स्पर्धा, नृत्य, गायन, प्रश्नमंजुषा, फॅशन शो, व्यक्तिमत्त्व स्पर्धा, मुकनाट्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचा समारोप दि. २८ फेब्रुवारी ला बक्षीस वितरणाद्वारे करण्यात येईल. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांच्या मार्गदर्शनात फार्मसी विद्यार्थी परिषद तसेच सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अथक प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने मागील २५ वर्षांपासून अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. औषधीनिर्माणशास्त्र सारख्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी यावेळी सांगितले.