संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- गंगा अवतंरण दिवसावर कन्हान नदी च्या किनारी स्थित महादेव घाट कंटोनमेंट येथे श्री गंगा आरती सेवा समिति द्वारे गंगा आरती केल्या गेली. ह्या वेळी हजारो भक्त महादेव घाट वर जमले होते, नदीचे संगोपन आणि नदी स्वच्छ निर्मल राहावी हेच जनजागृति उद्देश्य घेवून समितिने मागील 3 वर्षा पासून है आयोजन केले ह्या वेळी 3 रे वर्ष होते, ह्यावेळी महादेव घाट परिसराला सुंदर आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली होती, गंगा आरती करिता खास वाराणाशी काशी येथून पंडित आले होते 108 दिव्यांच्या भव्य अशे तीन स्टेजवर आरती ने भक्तांचे मन मोहुन गेले, सोबत भव्य फटाका शो आयोजित करण्यात आला होता आरती नंतर महाप्रसादाचा आस्वाद भक्तांनी घेतला.ह्या कार्यक्रमास राज्याचे भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले कामठी विधानसभा आमदार टेकचंद सावरकर ह्यांनी विशेष हजेरी लावली होती.
त्यांनी ह्यावेळी समितीचे कार्य नदी स्वच्छतेच्या करिता आपला वेळ देवून नदी स्वच्छ ठेवन्यास सहकार्य करावे अशे आव्हान केले. कामठी आणि आसपास क्षेत्रातील अनेक मान्यवर ही ह्यावेळी उपस्थित होते.. श्री गंगा आरती समिती चे पंडित विकास दुबे, रवि चमके, राजेश देशमुख, सुरेंद्र भक्ता, बिल्लू यादब, चंदू शिवरकर, नन्दू चिखले, महेश अग्रवाल, चेतन खडसे, प्रकाश सिरिया,अमित कुकडे, शंकर सोनटक्के.. सहयोगी समिति योगासन ध्यान केंद्र चे महेंद्र वाही, मोंटू बुटानी, प्रकाश सुखीजा, गणेश मंदिर समिती चे पल्लवी नायर, मनीष सिमरे ह्यांनी कार्यक्रमास अथक मेहनत घेत कार्यक्रमास सफल बनविले ह्यावेळी विवेक मंगतानी, संजय कनोजिया, सुनील खानवानी, सन्दीप कनोजिया, संगीता अग्रवाल, प्रीति कुल्लरकर, नरेश पारवानी इत्यादि ने आपली सेवा दिली…