नागपूर – माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी भूमी, अग्नी, वायु, जल व आकाश या पाचही क्षेत्रात माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी केल्या.
नागपूर जिल्ह्यातील माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये सहभागी असलेल्या ग्राम पंचायतींची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आज फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सहायक आयुक्त स्वाती इसाये, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) स्वप्नील मेश्राम, तांत्रिक अधिकारी संकेत तालेवार तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व संगणक परिचालक उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामपंचायतींना विविध क्षेत्रातील कामांविषयी व दस्तावेज तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीला अभियानाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
@ फाईल फोटो