संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 26 :- शासनाने प्रत्येक स्तरावर कारभार करता यावा म्हणून प्रशासनाची विभागणी केली.तसेच ग्रामस्तरावर विकास करता यावा यासाठी ग्रामपंचायतीची निर्मिती केली आहे.या ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडुन केलेल्या कर वसुलीतून ग्रामविकासाचा आराखडा तयार करावा लागतोव.ग्रामस्थांकडून पाणी कर, घरपट्टीकर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर आदी यासारखे कर वसुल करावे लागतात परंतु काही नागरिक कर भरण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने त्याचा परिणाम ग्रामविकासावर होत असून कामठी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. अनेक ग्रामपंचायती कडे लाखो रूपयाची थकबाकी असल्याने या थकीत असलेल्या करामुळे ग्रामपंचायती नागरिकापुढे हतबल झाली आहेत .
या थकीत कराबाबत ग्रामपंचायतीने वारंवार सांगूनही ग्रामस्थ कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे गावातील विकास कामांना खीळ बसण्याचा प्रश्न उभा होतो .गाव विकासासाठी कर आवश्यक आहे.एकंदरीत गावाचा विकास करायचे म्हटले तर गावातील कर वसुली पूर्ण होणे आवश्यक आहे तरच वसुल झालेंल्या करातून गावात विविध सुधारणा करता येतात .नविन रस्ते, नाली, दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य विषयी, विविध सुविधा गावात उपलब्ध करता येतात त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कराचा भरण्यावर जोर द्यावा, जेणेकरून गावात विकासकामे करता येतील असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केम ग्रामपंचायतचे सरपंच अतुल बाळबुधे सह आदी सरपंचांनी केले आहे.
बॉक्स:-सरपंच अतुल बाळबुधे –थकीत करामुळे ग्रामविकासास एक प्रकारची खीळ बसते त्यामुळे ग्रामस्थांनी थकीत कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून वसुल झालेल्या करातून ग्रामविकासाचा आराखडा आखून गावात विविध विकास कामे करता येतात.