नागपूर :- गुरुदेव सेवा मंडळ पेन्शन नगर नागपूर येथे ६ व ७ एप्रिल २४ ला ग्राम जयंतीची सुरुवात ग्रामसफाई ध्यान व प्रार्थना यांनी झाली. ग्रामजयंतीच्या निमित्याने स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल खापरी यांच्या सौजन्याने निशुःल्क डोळे तपासणी करून चष्म्याचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी साईबाबा भजन मंडळ सुंदर कांड रामायण पाठ करून सायंकाळी रवींद्र कुमार, गोंदेडा जिल्हा चंद्रपूर यांचे प्रवचन झाले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. भास्करराव विघे गुरुजी यांच्या काल्याचे किर्तनाने झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी अजय भेंडे यांनी सामुदायिक ध्यान व प्रार्थनेचे 100 पुस्तके वाटली तसेच श्री यादव रावजी चौधरी यांनी आरोग्य साधना व अनुभव प्रभावी उपचार ही पुस्तके भाविकांना स्वतःहून दिली. कार्यक्रमाला प्रामुख्याने गुरुदेव सेवा मंडळ नागपूरचे अध्यक्ष अँड.अशोक यावले, ज्ञानेश्वर रक्षक रामराव चोपडे, भुसारी महाराज गुरुकुंज मोझरी चे प्रचार प्रल्हाद पारीसे कामठी नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष माया चौरे, नरेश बर्डे गोपाळराव शिंगूरकर, बाबाराव पाटील, दिलीप वराडे, प्रकाश भालेराव पुंडलिक बाबू चौधरी सियाराम चावके, तळवेकर राजू पवार, डगवार, प्रा.दिगबंर सहारे, प्रा.चांभारे, नानाजी सायरे उपस्थित होते ध्यानाच्या कार्यक्रमावर प्रामुख्याने परसवाड्याचे नाना महाराज उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष वसंतदास कुंभारे उपाध्यक्ष राजेंद्र पितृडा सचिव रमेश सोनकुसरे प्रचारक प्राध्यापक रामदास टेकाडे सदस्य यादव रावजी चौधरी मधुकर राऊत गोविंदराव श्रीरामे दामोधर मामुलकर अरुण राऊत तेजराम करडे संजय मोहोड दिलीप बूंदगुलवार वसंता फरतोडे सुधाकर पराते कृष्णराव सांबारे विजय गिरी पवनीकर सतीश रायकवार विठ्ठलराव झोडे संतोष संभे संजय कुंभारे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता रमेश सोनकुसरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी रामधून मध्ये ध्यानावर व प्रार्थमधे मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.