राज्यपालांचे वाहनचालक मोहन मोरे सेवानिवृत्त: राज्यपाल कोश्यारींकडून भावपूर्ण सत्कार

मुंबई :-राज्यपालांचे वाहन चालक असलेले मोहन मोरे सेवानिवृत्त झाल्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी त्यांचा राजभवन येथे हृद्य सत्कार केला.

दिनांक ३१ जानेवारी रोजी निवृत्त झालेल्या मोहन मोरे यांना राज्यपालांनी सहकुटुंब आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. एका छोटेखानी निरोप समारंभात राज्यपालांनी मोरे यांच्या उत्कृष्ट कामाचा गौरव केला व त्यांना भावी वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. गेली तीन वर्षे मोरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते. 

यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी व सहकाऱ्यांनी आपल्या समयोचित भाषणांमधून मोहन मोरे यांच्या कार्याचा तसेच मनमिळावू स्वभावाचा गौरव केला.

राष्ट्रपती व पंतप्रधानांचे देखील केले सारथ्य  

मुळचे दुधगाव, महाबळेश्वर येथील असलेले मोहन मोरे तब्बल ४० वर्षांच्या राजभवनातील शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मोहन मोरे जानेवारी १९८३ मध्ये शासकीय सेवेत क्लिनर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी १९८७ पासून वाहनचालक म्हणून काम केले.

आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. पी सी अलेक्झांडर, मोहम्मद फजल, एस एम कृष्णा, एस सी जमीर यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या वाहनाचे सारथ्य केले.

देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंह तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद राजभवन येथे आले असताना त्यांच्या वाहनाचे देखील मोरे यांनी सारथ्य केले होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Feb 2 , 2023
ठाणे :- देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ‘मैत्री’ अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com