दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०७ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांनी राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची सर्वांनी शपथ घेतली.

राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राज्यपालांच्या सह सचिव (प्रशासन) श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व महर्षी सुदर्शन जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Tue Nov 19 , 2024
नागपूर :- थोर क्रांतीकारक व आदिवासी समाजसुधारक ‍बिरसा मुंडा व महर्षी सुदर्शन महाराज यांच्या जयंती निमित्त पुर्णकृती तैलचित्राला म.न.पा.तर्फे माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपसंचालक डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, जयसिंग कच्छवाह, मोती जनवारे, रवि करोसिया, शशी सारवान आदी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com