नागपूर :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे 12 डिसेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार (दि.12) रोजी दुपारी 12.40 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे मुंबई येथून विमानाने आगमन. दुपारी 12.45 वाजता राजभवनकडे रवाना. दुपारी 1.10 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता राजभवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे सायंकाळी 6 वाजता ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन व टिचिंग एक्सपर्ट पुरस्काराचे वितरण होईल.
बुधवार (दि.13) रोजी सकाळी 10.20 वाजता राजभवन येथून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता तेथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर सकाळी 11.40 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव.
गुरुवार दि. 14 डिसेंबरला सकाळी 8.25 च्या विमानाने मुंबईला रवाना होतील.