राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन

Ø समाधिस्थळास भेट व पुष्पचक्र अर्पण

Ø श्रद्धांजली सभेत सहभाग, वृक्षारोपन

यवतमाळ :- स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्ष मंत्री असलेले जवाहरलाल दर्डा यांच्या 27 व्या स्मृतिदिनानिमित्त राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या समाधीस्थळास भेट देऊन अभिवादन केले.

यावेळी माजी खासदार डॉ.विजय दर्डा, माजी राज्यमंत्री राजेंद्र दर्डा, नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगूळकर, किशोर दर्डा उपस्थित होते. दर्डा उद्यानातील प्रेरणास्थळ येथे आगमण झाल्यानंतर राज्यपालांनी समाधीस्थळास भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी बाबूजींच्या अनेक लोकोपयोगी कामांचा उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

उद्यान परिसरात विणादेवी दर्डा व ज्योत्सना दर्डा यांच्या समाधीस्थळास भेट देऊन तेथे देखील पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उद्यान परिसरात वृक्षारोपन केले तसेच नोंदवहित अभिप्राय नोंदविली. स्मृतीदिनानिमित्त आयोजित संगीत श्रद्धांजली सभेत देखील ते सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर परिमंडलातील एक लाखावर ग्राहकांना लोक अदालतीचे समन्स

Mon Nov 25 , 2024
– थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी लोक अदालत सप्ताह नागपूर :- कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने अभय योजना 2024 आणली आहे. या योजनेची माहिती व लाभ संबंधित ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्थायी लोक अदालत मंच, नागपूर व महावितरण नागपूर परिमंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावितरण लोक अदालत सप्ताहाचा शुभारंभ स्थायी लोक अदालत मंच,नागपूर चे अध्यक्ष दिपक भेंडे यांचा हस्ते आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!