राज्यपाल, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नक्षलग्रस्त भागातील युवकांशी संवाद

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह तसेच युवक व क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांचेसह देशाच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधून मुंबई भेटीवर आलेल्या युवक-युवतींशी राजभवन येथे संवाद साधला. यावेळी बिहारच्या नक्षलग्रस्त गया, जमुई, लखीसराय तसेच तेलंगणा राज्याच्या खम्मम येथील २१८ युवक युवती उपस्थित होते. 

आपण कितीही लहान गावातून आलो असलो तरीही उच्च ध्येय, कठोर परिश्रम व प्रामाणिकपणामुळे जीवनात प्रगती करू शकतो असे राज्यपालांनी आदिवासी युवक युवतींना सांगितले.

नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील युवकांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने तसेच नेहरू युवक संघटन केंद्राच्या पुढाकारातून १३ व्या आदिवासी युवक आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून युवक युवतींची राजभवन भेट तसेच राज्यपालांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवक युवतींनी आपले अनुभव कथन केले.

कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे महासंचालक नितेश कुमार मिश्रा,  नेहरू युवा केंद्र  संघटनेचे महाराष्ट्र निदेशक प्रकाश कुमार मनुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर जिल्ह्यात राज्य शासनाच्या दोन वर्षातील कारकीर्दीवर आधारित पथनाट्य

Sat Mar 26 , 2022
पारंपारिक लोककलांची जनतेला मेजवानी  ग्रामीण जनता उत्स्फूर्त प्रतिसाद  नागपूर : राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्धी आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा सादर करणारे पथनाट्य जिल्ह्यामध्ये विविध भागात सध्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत सुरू आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या जनतेच्या पारंपारिक कलांची ही मेजवानी मनाला भावत आहे.   गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटात असणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पारंपारिक कलागुणांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com