नागपूर :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे उद्यापासून (दि.२८) दोन दिवसांच्या नागपूर दौ-यावर येत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उद्या बुधवारी (दि.२८) दुपारी पावणेपाच वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते राजभवनकडे प्रयाण करतील.भगतसिंह कोश्यारी रात्री राजभवन येथे मुक्काम करतील.
शहरात गुरुवारी (दि. २९) सकाळी दहाला आयोजित एका स्थानिक कार्यक्रमास त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजता त्यांचे राजभवन येथे आगमन होईल. दुपारी साडेतीन वाजता ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.