राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुंबईकडे प्रयाण

नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्हयांचा दोन दिवसीय दौरा आटपून आज सकाळी सात वाजता मुंबईकडे रवाना झालेत.

विमानतळावर विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी त्यांना निरोप दिला.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. या भेटीत त्यांनी शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. गुरुवारी रात्री राजभवन नागपूर येथे मुक्कामी होते. आज सकाळी मुंबईला ते रवाना झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेडा येथे सार्वजनिक मातामाय मंदिरात गाव पूजा मोठ्या उत्साहात साजरी

Fri Jul 8 , 2022
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी – गावकऱ्यांनी 100 वर्षाची परंपरा कायम ठेवली कामठी – तालुक्यातील येरखेडा येथील गावकऱ्यांनी सार्वजनिक मातामाय मंदिरात गाव सार्वजनिक गाव पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली इंग्रजाचे काळात 100 वर्षांपूर्वी येरखेडा गावचे सदाशिवराव पाटील यांनी गावात नैसर्गिक आपत्ती येऊ नये, पीक पाणी मोठ्या प्रमाणात व्हावे, गावात विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन समाजात राष्ट्रीय एकता निर्माण होऊन सुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!