नागपूर :- शिवशक्ती आखाडा च्यावतीने आयोजित “प्रवास एक योद्धाचा कौतुकाचा सोहळा” बुधवारी संपन्न झाला. यासोबतच मुलांना उन्हाळी शिबिर आणि आष्टीडू जिल्हास्तरीय स्पर्धा आणि हिवाळी मोहीमेचे प्रमाणपत्रे वितरण करण्यात आले. आणि विशेष मान्यवरांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
नुकताच तलवारबाजी मध्ये विश्वविक्रम करणारे हितेश डफ यांच्या सुद्धा परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर सपकाळ, अतुल गुरू, दत्तात्रेय सोनगावकर सोबतच उपस्थित होते.
मनोहरराव सपकाळ यांनी देशातील विविध समस्या सोडविण्यासाठी, देशाच्या विकासासाठी सामाजिक कार्याची आवश्यकता आणि त्यासाठि प्रमाणिक, चारित्र्य संपन्न, देशभक्त समाज निर्मितीची आवश्यकता याविषयी मुलांना मूल्यवान मार्गदर्शन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी संपूर्ण शिवशक्ती परिवाराने सहकार्य केल त्यांचा खूप खूप आभार मानले.