शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या लोकाभिमुख असून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही शासकीय यंत्रणेची आहे. योग्य नियोजन व जनजागृती करून मार्च 2023 पर्यंत उद्दिष्टांची पूर्तता करावी असे निर्देष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज विभागीय प्रादेशिक संचालक नगर परिषदेची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नगरपरिषदेच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके, जिल्हा सहाय्यक आयुक्त्‍ अतुल पंत, याची उपस्थिती होती . भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील जिल्हाधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची दुरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थिती होती.

आठावा बैठकीमध्ये नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत यांनी 45 टक्के मालमत्ता व पाणीपट्टी कर उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उर्वरित जिल्ह्यांनी 40 टक्के पर्यंतचे काम पूर्ण केली आहेत. याप्रमाणे उर्वरित काम इतर जिल्ह्यांनी दिलेल्या वेळेत 100 टक्के पूर्ण करावीत, अशा सुचना बिदरी यांनी दिल्यात. बैठकीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अमृत 1.0 अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0, माझी वसुंधरा अभियान, मालमत्ता, पाणीपट्टी कर वसुली तसेच नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये वर्ग क व ड ची रिक्त पदे भरती बाबत विषयनिहाय उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरी सुविधा पुरण्याबाबत तत्पर व्हा : मनपा आयुक्त तथा प्रशासक, नागपूर महानगरपालिकेचा स्थापना दिन उत्साहात साजरा

Fri Mar 3 , 2023
नागपूर : समाजातील प्रत्येक स्तरातील व्‍यक्तीपर्यंत दररोज पोहोचणारी यंत्रणा नागपूर महानगरपालिका आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे जनतेला विविध ४२ प्रकारच्या नागरी सुविधा पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या वाढत असताना या सर्व सुविधा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत मनपाची जबाबदारी वाढत आहे. मनपाचा प्रत्येक विभाग हा शहरातील प्रत्येक नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याने आपापल्या विभागाचे मुळ उद्दिष्ट लक्षात घेउन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com