मच्छिमारांना डिझेल परतावा देण्याबाबत शासन सकारात्मक – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई :- मच्छीमारांना आवश्यक मदत करण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक आहे. जे मच्छीमार नियमानुसार मच्छीमारी व्यवसाय करतात अशा मच्छीमारांना त्यांचा डिझेलचा परतावा शंभर टक्के दिला जाईल. डिसेंबर २०२४ पर्यंत अशा मच्छीमारांना डिझेल परतावा पोटी ११९.९८ कोटीचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य महेश बालदी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मत्स्य व्यवसाय मंत्री राणे म्हणाले, मत्स्यव्यवसाय हा रोजगार देणारा व्यवसाय असून शासन मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी ठामपणे पाठीशी उभे आहे. दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रलंबित असलेला डिझेल परतावा देण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याबाबत वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून त्यांनीही डिझेल परतावा देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले आहे. मच्छीमारांना डिझेलचा परतावा मिळण्याबाबतची बैठक अधिवेशन काळात विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात घेण्यात येईल, असेही राणे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आदिवासी पाड्यातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यास प्राधान्य - आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

Fri Mar 7 , 2025
मुंबई :- आदिवासी समूहांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा घडवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांना विकासाची संधी मिळाली पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. त्यांना मूलभूत सोयीसुविधा प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी वाड्यातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!