शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त प्रसारण होणार

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत

मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. २८, बुधवार दि. २९ आणि गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पर्यटन विभागाच्या कामकाजावर आधारित ही मुलाखत घेण्यात आली आहे. “माझी वसुंधरा” हे अभियान, या अभियानाचे स्वरूप, ग्लासगो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्याचा करण्यात आलेला गौरव, पर्यावरण व हवामान बदल रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग, कृषी पर्यटन, कॅरॅव्हॅन व कॅम्परव्हॅन ही नवीन संकल्पना, मुंबईचा पर्यटनदृष्ट्या विकास आदी विषयांची माहिती श्री. ठाकरे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करावे-  उपमुख्यमंत्री अजित पवार

Sun Dec 26 , 2021
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का): जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती सरकार म्हणून आम्ही करू. विकासासाठी काम करताना त्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकोप्याने काम करा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.             जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात नियोजन समितीचे कामकाज, कोविड – 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजना तसेच चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याविषयी आढावा बैठकीचे आयोजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com