गोराबाजार येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या

– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 5 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोराबाजार येथे नातेवाईकाच्या घरी विश्रांती करायला गेलेल्या एका इसमाने घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 12 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव राजू पिल्ले वय 52 वर्षे रा हनुमान नगर रणाळा असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सदर मृतक हा रणाळा येथील रहिवासी असून छावणी परिषद परिसरातील एका माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या स्वतःच्या मुलाला घरी नेण्याच्या प्रतीक्षेत गोराबाजार येथील एका नातेवाईकाच्या घरी विश्रांती करीत होते तर शाळा सुटून बराच वेळ होऊनही वडील शाळेत घ्यायला आले नसल्याने मुलगा पायो चालत नातेवाईकाच्या घरी गेले असता मृतक वडीलाने कापडी दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच घरमंडळीना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर शासकोय उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे तर मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रणाळ्यात मुख्याध्यापिकेला अश्लील चाळे करणाऱ्या इसमास अटक

Sat Mar 5 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील रनाळा येथील एका शासकीय शाळेच्या मुख्याध्यापीकेला सतत अश्लील चाळे करणाऱ्या इसमास नवीन कामठी पोलिसांनी अटक केल्याची कारवाई काल दुपारी 3 वाजता सुमारास केली असून अटक आरोपी चे नाव रमेश कवडू बांते वय 52 राहणार नेहरूनगर मोंढा कामठी असे आहे. आरोपी हा गेल्या तीन महिन्यापासून रनाळा येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com