शिक्षण उपसंचालकांची मनपा शाळेला सदिच्छा भेट

चंद्रपूर :- नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, सहाय्यक संचालक दीपेंद्र लोखंडे व नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांचे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मनपाच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय येथे शुक्रवार २६ जुलै रोजी सदिच्छा भेट देऊन आज पर्यंत झालेल्या शिक्षण सप्ताह मधील उपक्रमांची माहिती जाणुन घेतली.

यावेळी मान्यवरांनी शाळेच्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले व शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर, त्यांनी विद्यार्थी, शिक्षकांशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या शाळेबद्दलच्या अनुभवांचे मत घेतले तसेच सर्व वर्गांना भेट देऊन प्रश्नोत्तराद्वारे विद्यार्थांची गुणवत्ता जाणून घेतली.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नागेश नित यांच्या कार्याचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली शाळेतील सर्व शिक्षकांच्या मेहनतीने शाळेची प्रगती होत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. शाळेच्या परस बागेला भेट देऊन परसबागेतील नाविण्यपूर्ण भौमितीक आकृती बघून कौतूक केले तसेच शाळेच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल सुरू असल्याचे गौरोवोद्गारसुद्धा याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबद्ध 

Mon Jul 29 , 2024
नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १८.०४.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे यशोधरानगर व गिट्टीखदान, नागपूर शहर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे जाबीर शेख वल्द रज्जाक शेख, वय २९ वर्ष, रा. संतोषनगर झोपडपटट्टी, पोलीस ठाणे यशोधरानगर, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com