हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

– ३१ ऑगस्ट पर्यंत चालणार मोहीम

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे शहरात राबविण्यात येणाऱ्या हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सुट्टीच्या दिवशी देखील घरोघरी जाऊन वितरीत करण्यात येणाऱ्या हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करून नागरिक या मोहिमेत सहभाग नोंदवित आहेत. ३१ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या देखरेखीत हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान शहरात हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

हत्तीरोग संदर्भात जनजागृती करण्याकरिता मनपाच्या लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन या झोनमध्ये जवळपास ६२४ जनजागृती बूथ उभारण्यात आले आहेत.

तसेच ५६७ चमूच्या माध्यमातून घरोघरी गोळ्या वितरित करण्यात येत आहे. तसेच हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांच्या निर्देशानुसार, आरोग्य कर्मचारी, विविध शाळा, नागरिक वसाहती येथे जाऊन हत्तीरोग विषयी जनजागृती करीत आहेत. सुट्टीच्या दिवशी देखील कर्मचारी घरोघरी जाऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहीम ३१ ऑगस्ट पर्यंत चालणार असून, नागरिकांनी सहकार्य करीत मोहिम यशस्वी करावी असे आवाहन हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आष्टे डु जिल्हा क्रिडा स्पर्धेत जय भवानी दाणपट्टा विजापुर (खंडाळा) चे सुयश

Mon Aug 21 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- १८ वी आष्टेडु मर्दानी आखाडा नागपुर जिल्हास्तरिय स्पर्धा रामटेक येथे घेण्यात आल्या. जय भवानी दाणपट्टा आखाडा विजापुर (खंडाळा) च्या विद्यार्थ्यानी शिवकलेत सुर्वण पदक, रजत पदक व कास्य पदक आणि प्रोत्सहानपर पुरस्कार प्राप्त करून गावाचे नावलौकिक केले. विजापुर (खंडाळा) येथील सागर नवघरे या तरूणाने राजेंद्र मुळक सहायता कक्षा व्दारे जय भवानी दाणपट्टा आखाडा विजापुर (खंडाळा) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com