अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पोलिसांनी दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा नाकारण्याचा निर्णय आणखी एका भाजपा समर्थित अपक्ष आमदाराने घेतला आहे. गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी Y+ सिक्युरिटी नाकारली आहे.
पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देत सुरक्षा काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गोंदिया शहरातील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला करून त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर त्यांना Y+ सिक्युरिटी पुरविण्यात आली होती. मात्र आता त्यांनी ही सुरक्षा नाकारली आहे.