१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या दिनांक २९ ऑगस्ट २०२३ च्या परिपत्रक क्रमांक ७४७ नुसार इयत्ता १२ वी च्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष औषधीनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता नोंदणी करता येईल. त्यामुळे डी.फार्म. अभ्यासक्रमात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ‌इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. सदर पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या प्रथम वर्ष औषधीनिर्माणशास्त्र पदविका डी.फार्म. अभ्यासक्रमाच्या संस्थास्तरीय प्रवेशाकरीता पात्र आहेत. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या https://phd23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होवून आपला प्रवेश निश्चित करता येईल.

प्रथम वर्ष औषधीनिर्माणशास्त्र पदविका डी.फार्म. अभ्यासक्रमात संस्थास्तरीय प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती करणे या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ डेट) दिनांक २० सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहील.‌

औषधीनिर्माणशास्त्र पदविका डी.फार्म. अभ्यासक्रमासाठी संस्थास्तरीय जागा तसेच केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिये नंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद उमेकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Cancer survivor girls tie Rakhi to Governor

Thu Aug 31 , 2023
Mumbai :-A group of cancer survivor girls tied Rakhi to Governor Ramesh Bais on the occasion of Raksha Bandhan at Raj Bhavan, Mumbai. The Governor distributed gifts to the little girls and appreciated the work of the Trust taking care of the cancer survivors. The visit of the cancer survivor children was organised by the Ankibai Ghamandiram Gowani Trust. Trustee […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com